आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Spotted With Sangeeta Bijlani At Film Screening

PHOTOS : एक्स-गर्लफ्रेंड संगीताबरोबर दिसला सलमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खान आणि गोविंदा अलीकडेच महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचले होते. या सिनेमात गोविंदा लीड रोलमध्ये आहे. हा एक रिमेक सिनेमा आहे. या सिनेमात सलमान खानसुद्धा गेस्ट अपिअरन्समध्ये असल्याची बातमी आहे.

सलमान आणि गोविंदा चांगले मित्र आहेत. मात्र काही काळापासून या दोघांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे. ब-याच काळानंतर हे दोघे सिनेमाच्या स्क्रिनिंगच्या निमित्ताने एकत्र दिसले.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्क्रिनिंगला संगीता बिजलानीची उपस्थिती आश्चर्यात टाकणारी होती. सलमान आणि संगीताचे अफेअर एकेकाळी खूप गाजले होते. सलमानबरोबरच्या संगीताच्या हजेरीने हे दोघे आताही चांगले मित्र असल्याचे स्पष्ट होते. काही दिवसांपूर्वी संगीता सलमानच्या कुटुंबियांबरोबरसुद्धा एका सार्वजनिक ठिकाणी दिसली होती. सलमानची बहीण अलविराही संगीताबरोबर यावेळी दिसली.

पाहा या स्क्रिनिंगची खास छायाचित्रे...