आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या बँक खात्यावर चालते वडीलांची दबंगिरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानचे वाद-विवाद खूप लवकर चर्चेत येतात, परंतू त्याच्या वैशिष्ट्यांना काहीच जण ओळखतात. सामाजातील तरुणांसाठी सलमानचे विचार प्रेरणादायी आहेत कारण 27 डिसेंबरला 48 वर्षाचा होणारा सलमान त्याची कमाई त्याच्या खात्यात जमा करतो, परंतू त्या खात्याच्या सहीचा अधिकार त्याचे वडील सलीम खानकडे आहे. सलमानच्या सिनेमा, जाहिराती आणि शोची सर्व कमाई त्याच्या अकाउंटमध्ये जमा होते. सलमानच्या प्रॉपर्टीची आणि इतर गुंतवणूक त्याचे वडीलचं करतात. चॅरिटी ट्रस्ट 'बीइंग ह्यूमन' ला प्रत्येक वर्षी 9 ते 10 कोटींचा चेक देण्याची जबाबदारी सलीम खान पार पाडतात.
रंजक बाब अशी आहे, की सलमानला पॉकेटमनीचा चेकसुध्दा सलीम खान देतात. दबंग खानला त्याच्या खात्यातून एक लाख काढायचे असो वा दहा कोटी चेकवर सहीचा अधिकार त्या्चा वडीलांकडेच आहे. सलमान कधीच स्वत: पैसे काढत नाही आणि त्याचे वडील त्याला कधीच हिशोब मागत नाही. सलमान स्वत: त्याच्या खर्चाचा सर्व हिशोब वडीलांना देतो.