आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Taunts Anu Malik As He Skips Nephew Armaan Malik’S Big Day

अनु मलिक यांच्या भाच्याच्या अल्बम लाँचसाठी पोहोचला सलमान, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता आणि संगीतकार डब्बू मलिक यांचा मुलगा अरमान मलिक इतरांप्रमाणेच सलमान खानला आपला गॉड फादर मानतो. म्हणून त्याने त्याच्या म्यूझिक अल्बम लाँचच्या निमिताने सलमानला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केले होते.
सलमान काल (30 जानेवारी) रात्री मुंबईमध्ये झालेल्या अरमानच्या म्यूझिक लाँचला आला होता. तिथे पाय ठेवताच सलमानला अरमानचे चुलते आणि डब्बू यांचे भाऊ अनु मलिक दिसले नाही. त्यावेळी सलमान अनु मलिक यांना टोमणा मारायला विसरला नाही.
या लाँचिंगवेळी सलमानने अरमानची सुरूवातीला प्रशंसा केली. सलमान अरमानची प्रशंसा करतेवेळी म्हणाला, की अरमानने स्वत:ला लहान वयात सिध्द केले आहे. त्यानंतर डब्बू मलिक, सलमान खान आणि अरमान यांनी म्यूझिक अल्बम लाँच केला.
म्यूझिक अल्बम लाँचिगला अनु मलिक यांची अनुपस्थित सलमानना पटली नाही आणि सलमानने त्यांच्यावर टोमणा मारला. सलमान म्हणाला, 'अनु मलिक इथे नसल्याचे मला आश्चर्य वाटते.'
जून्या आठवणी सांगताना सलमान म्हणाला, 'डब्बू मलिक यांना मी ब्रेक दिला होता. मला आठवते जेव्हा डब्बू यांना मी दोन गाण्यासाठी साइन केले,हे जेव्हा त्यांचा भाऊ अर्थातच अनु मलिक यांना समजले तेव्हा त्यांचे हावभाव बघण्यासारखे होते. अनु यांना आनंद होण्याऐवजी त्यांनी मला सांगितले, की त्यांच्या डब्बूला गाण्यासाठी साइन करू नको.'
अरमानच्या म्यूझिक अल्बमविषयी सांगायचे झाले तर, हा अल्बम धमाकेदार पध्दतीने लाँच करण्यात आला आहे. या अल्बममध्ये अरमानने तीन गाणी गायली असून डान्सही केला आहे.
रंजक गोष्ट आहे, की अरमानलासुध्दा सलमानने 'जय हो' या सिनेमात संधी दिली आहे, 'जय हो'मधील तीन गाणी अरमानने स्वरबध्द केली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा म्यूझिक अल्बम लाँचची काही छायाचित्रे...