आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan To Make Marathi Movie Yellow In Hindi

रितेशच्या \'YELLOW\'चा हिंदी रिमेक करणार सलमान, विशेष मुलीची कथा भावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक अनाथ मुलगा आणि त्याच्या कुत्र्यासाठी राजकारण्यांच्या विरोधात आठ छोट्या मुलांनी दिलेला लढा 'चिल्लर पार्टी' या सिनेमात रेखाटण्यात आला होता. 2011मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारावर आपली छाप सोडली होती. लहान मुलांवर सिनेमाचा विषय बेतला असल्याने अभिनेता सलमान खानने या कथेची निवड करुन त्याची निर्मिती केली होती. आता पुन्हा एकदा सलमान मुलांवर आधारित सिनेमाची निर्मिती करण्यास इच्छूक असल्याची बातमी आहे.
अलीकडेच रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या 'यलो' या मराठी सिनेमाचा पहिला ट्रेलर लाँच करण्यात आला. केवळ प्रेक्षकच नव्हे तर मीडिया आणि सलमान खानसुद्धा या सिनेमाने प्रभावित झाला आहे. बीईंग ह्युमन या बॅनरअंतर्गत सलमानने या सिनेमाचा हिंदी रिमेक करण्याची इच्छा रितेश देशमुखकडे व्यक्त केली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रितेशने या सिनेमाचा ट्रेलर सलमानला दाखवला होता. या संवेदनशील विषयाने सलमान खूपच प्रभावित झाला.
हा सिनेमा पूर्ण झाल्यानंतर तो बघून त्याचा आपल्या बॅनरअंतर्गत हिंदी रिमेक बनवणार असल्याचे सलमानने रितेशला म्हटले असल्याचे समजते.
या सिनेमाचे कथानक एका विशेष मुलीवर आधारित आहे. सलमानच्या मते, असे सिनेमे हिंदीतसुद्धा तयार व्हायला हवेत, जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचू शकतील.
सलमानने प्रोमो बघितल्यानंतर तो आवडला असल्याचे ट्विटसुद्धा केले होते.
रितेशचा निर्माता म्हणून हा दुसरा मराठी सिनेमा आहे. यापूर्वी रितेशने 'बालक पालक' या सिनेमाची निर्मिती केली होती. गेल्यावर्षी हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातही सलमानने रुची दाखवली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या 'यलो' या सिनेमाविषयी बरंच काही...