आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने स्वत: घेतली 'जय हो' फ्लॉप झाल्याची जबाबदारी, जाणून घ्या काय-काय म्हणाला?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानचा 'जय हो' सिनेमा रिलीज होऊन फक्त तीन दिवस झाले आहेत. सिनेमाला मिळालेल्या कमी ओपनिंगची जबाबदारी सलमानने स्वत:वर घेतली आहे. सलमानचा भाऊ सोहेल खानने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात नवीन स्टार्स आहेत आणि काही विस्मरणात गेलेले स्टार्स आहेत.
काही असो, पण सिनेमा चालवण्याचा सर्व भार सलमानच्या खांद्यावर होता. परंतु कमाईच्या बाबतीत 'जय हो'ने बॉक्स ऑफिसवर कोणताच ठसा उमटवला नाही. अलीकडेच एका टीव्ही चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणला, 'जर देवालाची इच्छा असेल तर सिनेमा सोमवारपासून चांगली कमाल दाखवेल. जर असे नाही झाले तर याची सर्व जबाबदारी माझी आहे. ही माझी चुक आहे, मी माझ्या चाहत्यांना थिएटर्सपर्यंत आणू शकलो नाही.'
सोबतच, सलमानने स्पष्ट केले, 'माझ्या मागील सिनेमांच्या तुलनेत या सिनेमाचा व्यवसाय थोडा कमी झाला आहे.'
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सलमानच्या या मुलाखतीमधील काही रंजक गोष्टी. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या जाणून घ्या 'जय हो'च्या कमी प्रतिसादाच्या मागची कारणे आणि सलमानने कशी घेतली जबाबदारी...