आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Turns Barber, Gives Head Massage To Women

PICS: सलमान खान चक्क बनला केस कापणारा, तरूणींच्या डोक्याची केली तेल मालिश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या 'जय हो' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ठिकठाक बिझनेस केला. खरं तर सलमानच्या या सिनेमाकडून बरीच अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र सिनेमाने जेमतेम शंभर कोटींच्या घरात कमाई केली. या सिनेमाच्या रिलीजनंतर सलमानच्या हातात बिग बॉस हा शो किंवा एखादा नवीन सिनेमाही नाहीये. अशावेळी सलमान खानने कलर्सच्या चॅनलवर प्रसारित होणा-या 'मिशन सपने' या रिअ‍ॅलिटी शोसोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
परंतु याहीपेक्षा एक रंजक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या शोमध्ये सलमान खान चक्क रस्त्यावर लोकांचे केस कापताना दिसणार आहे. विश्वास बसत नाहीये. अहो, पण हे खर आहे. इतकेच नाही तर त्याने तरूणींचा डोक्याची मालिशदेखील केली.
आता सलमान केस कापणारा तर झाला नाही ना असा विचार नक्कीच तुमच्या मनात डोकावला असेल ना? सलमानने लोकांचे केस कापले, तरुणींच्या डोक्याची मालिश केली हे खरे आहे. पण हे त्याने केल आहे 'मिशन सपने' या चॅरिटी रिअ‍ॅलिटी शोमध्ये. या शोमध्ये बॉलिवूड स्टार्सना एखाद्या दुकानात काम करावे लागणार आहे. या स्टार्सना जे काही पैसे मिळतील, ते त्या दुकान मालकाला देण्यात येणार आहेत. आता तुम्हीच विचार करा, सलमान खान कात्री घेऊन उभा दिसला तर लोक सलूनच्या दुकानापुढे रांग लावणारच ना.
या शोच्या अंतर्गत स्टार्सना सलून चालवणे, भाजी विकणे, चहाच्या दुकानात काम करणे यांसारखी अनेक काही छोटी-छोटी कामे करावी लागणार आहेत. सलमानविषयी सांगायचे झाले तर, तो एक दयावान व्यक्ती आहे. या शोच्या माध्यमातून त्याने कुरबान अली नावाच्या एका गरजू व्यक्तीची मदत केली आहे. एका अपघातात अलीचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सलमानची सलूनच्या दुकानात कटिंग करताना आणि मालिश करतानाची छायाचित्रे... सोबतच, जाणून घ्या रंजक गोष्टी....