आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानने लंडनहून चाहत्यांना म्हटले 'ईद मुबारक'...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेता सलमान खान यंदाची ईद आपल्या कुटुंबीय आणि मित्रांबरोबर भारतात साजरी करत नाहीये. आपल्या आगामी 'किक' सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने सलमान ईदच्या दिवशी यावर्षी लंडनमध्ये आहे.
हिट अँड रन प्रकरणी आरोप निश्चिती झाल्यानंतर सलमान लवकरात लवकर आपल्या सिनेमाचे शूटिंग पूर्ण करत आहे. यासाठी त्याने न्यायालयाकडे वेळ मागितला आहे.

न्यायालयाकडून परवानगी मिळताच सलमान वेळ न दवडता 'किक' सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाला. त्यामुळे यावर्षी भारतात नव्हे तर लंडनमध्ये सलमान ईद साजरी करतोय. या सणाच्या दिवशी सलमानला आपल्या मायदेशाची आठवण होणार नाही असं बरं कसं होईल.

म्हणूनच सलमानने फेसबूकवर एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानने या सात सेकंदांच्या व्हिडिओत म्हटले, की ''माझ्या सर्व चाहत्यांना माझ्याकडून ईदच्या शुभेच्छा.''

सलमानने आपल्या बीईंग ह्युमन या एनजीओच्यावतीने आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसे पाहता सलमान आपल्या कुटुंबीय आणि मित्रांबरोबर ईद मोठ्या थाटात साजरी करत असतो. यादिवशी तो आपल्या जवळच्या मित्रांना घरी आमंत्रित करत असतो. शिवाय मीडियालासुद्धा तो लंचसाठी घरी बोलवत असतो. मात्र यावर्षी लंडनमध्ये आपल्या सिनेमाच्या टीमबरोबर सलमान ईद सेलिब्रेट करतोय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा लंडनमधील 'किक'च्या शूटिंगची खास छायाचित्रे...