आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सलमान खानने त्याच्या नवा चित्रपट 'एक था टायगर'च्या प्रमोशनसाठी लहान शहरांमध्ये जाण्यास नकार दिला आहे. छोट्या शहरात प्रमोशनसाठी न जाण्यामागे त्याच्याकडे ठोस कारण देखील आहे.
समलानच्या मते, प्रमोशनच्या वेळी बरीच गर्दी जमा होते. या गर्दीत महिला आणि लहान मुले देखील असतात, याचा काही लोकांकडून गैरफायदा घेतला जातो आणि महिलांची छेड काढली जाते. मुलांना आणि वयस्कर लोकांना देखील धक्का बुक्की होण्याची शक्यता असते. अशा प्रकारची एखादी घटना न घडो अशी आमची इच्छा आहे.
तो पुढे म्हणाला की, या गर्दीत कोणाला दुखापत झाली तर ती एखाद वेळेला चालू शकेल, पण कोणाचा मृत्यू झाला तर त्याची संपूर्ण जवाबदारी आमच्यावर येईल. आमच्या रक्षणासाठी असलेल्या एखाद्या सुरक्षा रक्षकाने कोणाला ढकलले तर त्या गोष्टीचा देखील मुद्दा बनवला जातो.
कॅट सलमानचा हा चित्रपट येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित केला जाणार आहे.
सलमान खान अडचणीत, 'एक था टायगर' विरोधात याचिका दाखल
NEW STILLS: सलमान-कतरिनाचा फुलऑन रोमान्स
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.