आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Worried About Jai Ho Box Office Collection

‘जय हो’ चित्रपटाच्या व्यवसायाची सलमान खानला चिंता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आजवर बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडणार्‍या सलमान खानला सध्या त्याच्या ‘जय हो’ चित्रपटाच्या व्यवसायाची चिंता सतावत आहे. यापूर्वी सलमानने कधीही असे वक्तव्य केले नव्हते. त्याच्या अशा बोलण्यामुळे बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.
या चित्रपटाच्या यशासाठी सलमानने धडाक्यात प्रमोशनला सुरुवात केली आहे. अलीकडेच त्याने ‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ या शोमध्ये हजेरी लावली होती. या वेळी त्याचा भाऊ सोहेल खान याचीही उपस्थिती होती.
‘जय हो’ मध्ये सलमान, तब्बू, डॅनी डेंग्झोपा, डेझी शाह, सना खान, सुनील शेट्टी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.