आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan's Blackbuck Case To Open On March 24

काळवीट शिकार प्रकरणी सलमान पुन्हा गोत्यात, 24 पासून जोधपूर कोर्टात सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळवीट शिकार प्रकरणाची सुनावणी येत्या 24 मार्चपासून सुरु होणार आहे. याप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूरच्या सेशन कोर्टात जवाब नोंदवण्यासाटी हजर राहावे लागणार आहे. मध्यंतरी मुख्य दंडाधिका-यांनी सलमानला कोर्टात हजर न राहण्याची मुभा दिली होती. मात्र आता मिळालेल्या बातमीनुसार, सलमानला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
1998 मध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना सलमानसह सैफ-अली-खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर काळविटाची शिकार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याचदरम्यान सलमानच्या हॉटेलच्या बाथरुममधून अवैध हत्यारसुद्धा जप्त केले होते. त्यावेळी पोलिसांनी सलामनवर काळवीट शिकार प्रकरण आणि आर्म्स अॅक्टअंतरर्गत अवैध हत्यार बाळगल्याचाही गुन्हा दाखल केला होता.
फेब्रुवारी 2006 मध्ये काळवीट शिकार प्रकरणी सलमानवर वाइल्ड लाइफ अॅक्टअंतर्गतसुद्धा आरोप निश्चित झाले होते. त्यानंतर 2012मध्ये सलमानवर दंडही ठोठावण्यात आला होता.