पुढील महिन्यात प्रदर्शित होत असलेल्या ‘ओ तेरी’ या चित्रपटाचा प्रचार आणि संगीत लाँच करण्यात व्यग्र असलेला दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री
सलमान खानसोबत एक चित्रपटाची निर्मिती करण्याची योजना आखत आहे. त्याने ‘बॉडीगार्ड’च्या सिक्वेलबाबत काही लेखकांसोबत चित्रपटाच्या कथेबद्दल चर्चादेखील केली आहे.
सूत्रानुसार अतुलने आपल्या आवडीची एक कथा काही लेखकांना दिली असून त्यावर तो काम करत आहे. सलमानच्या चाहत्यांना आवडणार्या अॅक्शन चित्रपटांची रचना लक्षात घेऊनच या चित्रपटाची कथा लिहिली जात आहे. ‘ओ तेरी’ प्रदर्शित झाल्यानंतर अतुल एका योग्य पटकथेसोबत सलमानकडून त्याची तारीख निश्चित करून घेणार आहे. त्यासाठी अतुलला दोन वर्षांची वाट पाहावी लागणार आहे.