आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाऊथच्या दोन अभिनेत्री बी टाऊनमध्ये धमाल करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानमुळे या दोघींना बी टाऊनमध्ये एन्ट्री मिळाली आहे. आता सलमान यांचे नशीब चमकवणार आहे. सलमानने या दोघींना चक्क आपल्या आगामी सिनेमात कास्ट केले आहे. बी टाऊनमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी या दोघी साऊथ सिनेमांमध्ये झळकल्या आहेत. या दोघींची नावे आहेत सना खान आणि डेजी शाह. सलमान खानच्या आगाम 'मेंटल' या सिनेमात काम करण्याची संधी या दोघींना मिळाली आहे.
एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, 'मेंटल'मध्ये सना आणि डेजीच्या प्रमुख भूमिका असून सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. गेल्याच आठवड्यात डेजीने सलमानबरोबर दुबईत एका गाण्याचे शुटिंगही पूर्ण केले.
डेजी अभिनेत्रीबरोबरच कोरिओग्राफरसुद्धा आहे. तिने अनेक कन्नड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
तर सना जाहिरातींमधला प्रसिद्ध चेहरा असून यापूर्वी ती बिग बॉसमध्येही झळकली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.