आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Salman Khan's New Movie Ek Tha Tiger In Controvercy Again

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमान खान अडचणीत, 'एक था टायगर' विरोधात याचिका दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - सलमान खानचा आगामी 'एक था टायगर' हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. या चित्रपटाविरोधात राजस्थान हायकोर्टमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. जयपूरच्या वैशाली नगरमध्ये राहणारे विक्रम वशिष्ठ यांनी ही याचिका दाखल केली आहे. चित्रपटाची कथा त्यांच्या मामाच्या खासगी आयुष्यावर आधारित असल्याचा दावा विक्रम वशिष्ठ यांनी आपल्या याचिकेत केला आहे.
चित्रपटाचे क्रेडिट त्यांच्या मामाला देण्यात यावे, अशी मागणी विक्रम यांनी केली आहे. बुधवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. विक्रम यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांचे मामा दिवंगत रविंद्र कौशिक पाकिस्तानामध्ये भारतीय गुप्तहेर होते. १९७९ ते ८३ या काळात ते पाक सेनेत होते. मात्र १९८३साली त्यांची खरी ओळख पाकला पटल्यानंतर त्यांना अटक करुन तुरुंगात टाकण्यात आले होते. २००१ साली तुरुंगात त्यांचा मृत्यु झाला.
चित्रपटात संक्षिप्त स्वरुपात तरी रविंद्र कौशिक यांच्याबद्दल माहिती दिली जावी, अशी विक्रम वशिष्ठ यांनी मागणी केली आहे.
NEW STILLS: सलमान-कतरिनाचा फुलऑन रोमान्स
कतरिनाला तोकड्या कपड्यात बघून चिडला सलमान, पहिल्यांदा शिवीगाळ, नंतर केली मारहाण !
PHOTOS : तीन वर्षांनंतर एवढ्या जवळ आले कॅट-सलमान