आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan\'s Prem Ratan 100 Crore Box Office Dhan Payo

\'प्रेम रतन\' 3 दिवसांत शंभर कोटी क्लबमध्ये, भावेची \'कट्यार\'ही जोरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम रतन धन पायो चित्रपटातील एक क्षण... - Divya Marathi
प्रेम रतन धन पायो चित्रपटातील एक क्षण...
मुंबई- राजश्री प्रॉडक्शनची निर्मिती आणि जोडीला सलमान खान असे समीकरण 16 वर्षांनतर पुन्हा एकदा जुळून आले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या "प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाने केवळ तीन दिवसांत 100 कोटी क्लबमध्ये सहभागी होण्याचा मान मिळवला आहे. पाडव्याला म्हणजेच गुरुवारी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40.35 कोटींचा व्यवसाय केला, तर शुक्रवारी 31.05 कोटींची कमाई केली. शनिवारीही 30.07 कोटींचा व्यवसाय करत आतापर्यंत या चित्रपटाने 101.47 कोटींची कमाई केली आहे. रविवारीही हा चित्रपट प्रेक्षकांना खेचण्यात यशस्वी झाला मात्र रविवारची आकडेवारी समोर आली नाही.

'हम साथ साथ हैं' चित्रपटानंतर सोळा वर्षांनी सलमानने राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटात काम केले आहे. 'मैंने प्यार किया' चित्रपटापासून सलमान आणि राजश्रीचा हिट चित्रपटांचा सिलसिला सुरू झाला होता. त्यानंतर 'हम आपके हैं कौन' आणि "हम साथ -साथ' मध्ये दोघांनी एकत्र काम केले. या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम नोंदवले होते. येत्या काही दिवसांत 'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडेल, असे चित्रपट जाणकारांना वाटते.
'कट्यार काळजात'ही जोरात
दिवाळीत प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक सुबोध भावेच्या 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपटही राज्यभरात हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहे. या चित्रपटात शंकर महादेवन, सचिन पिळगावकर, सुबोध भावे आणि पुष्कर श्रोत्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या काही दिवसांत मराठीतील अनेक विक्रम मोडेल, असा अंदाज आहे.