आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan’S Sister Arpita Inks Family Tree On Hand

सलमानच्या बहिणीने आईवडिलांसह भावांच्या नावाचा टॅटू हातवर गोंदवून व्यक्त केले प्रेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान आपल्या कुटुंबियांवर असलेले प्रेम कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्यक्त करत असते. यावेळी अर्पिताला कुटुंबीयांवर असलेले स्वतःचे प्रेम व्यक्त करण्यासाठी दुखणे सहन करावे लागले आहे. होय, सलमानच्या या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर एक खास टॅटू गोंदवून घेतला आहे. हा टॅटू दिसायला युनिक असून स्टारच्या आकारातील आहे.
या टॅटूचे वैशिष्ट्य म्हणजे या स्टारच्या आउटलाईनवर खान कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे नाव लिहिण्यात आले आहे. या टॅटूमध्ये अर्पिताने वडील सलीम खान, आई हेलन आणि सलमा, भाऊ सलमान, अरबाज आणि सोहेल यांच्यासह मैत्रीण दीक्षाचे नाव गोंदवले आहे.
अर्पिताची खान कुटुंबातील एन्ट्री ही सलीम खान आणि हेलन यांच्या लग्नानंतर झाली होती. सलीम आणि हेलन यांनी अर्पिताला दत्तक घेतले आहे. सलमान, अरबाज, सोहेल आणि अलवीरा ही सलीम आणि त्यांची पहिली पत्नी सलमा खान यांची मुले आहेत. तर अर्पिता सलीम आणि हेलन यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे.
खान कुटुंबियांचे अर्पितावर जीवापाड प्रेम आहे. तिघेही भाऊ आपल्या या बहिणीची खूप काळजी घेतात. विशेषतः सलमानसोबत तिचे स्ट्राँग बॉन्‍डिंग आहे. पार्टी असो वा एखादा इवेंट अर्पिता सलमानसह दिसत असते. भावांप्रमाणेच अर्पिताचे बहीण अलविरासह खूप जवळचे नाते आहे. सलमानचे कोर्ट ट्रायल असताना या दोघी बहिणी त्याच्यासोबत दिसत असतात.
अर्पिताप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आपल्या शरीरावर टॅटू गोंदवून घेतले आहेत. अभिनेत्री आलिया भट्टने अलीकडेच आपल्या आागमी हायवे सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मानेवर 'पटाका' असा टॅटू गोंदवून घेतला. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा काही निवडक सेलिब्रिटींनी त्यांच्या शरीरावर गोंदवून घेतलेले टॅटू...