आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या बहिणीचे वजन गेले नियंत्रणाबाहेर, भावाकडून विसरली फिटनेस टिप्स घ्यायला ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खान बॉलिवूडच्या सर्वात फिट सेलिब्रिटींपैकी एक आहे. तो फिटनेसविषयी एवढा जागरुक आहे, की त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष द्यावं लागतं.
सोनाक्षी सिन्हा, अर्जुन कपूर, ऋतिक रोशन या सेलिब्रिटींनी सलमानच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे वाढलेले वजन कमी केले. फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी हे सर्व स्टार्स बरेच लठ्ठ होते, मात्र सलमानकडून मिळालेल्या फिटनेस टिप्समुळे ते बॉलिवूडमध्ये यशस्वी झाले.
आपल्या मित्रमंडळींना फिटनेसचे धडे देणा-या सलमानचे त्याच्या बहिणीकडे मात्र दुर्लक्ष असल्याचे अलीकडेच दिसून आले.
सोमवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी सलमानची धाकटी बहीण अर्पिताला बघून असेच वाटले. यावेळी अर्पिताचे वाढलेले वजन स्पष्ट दिसत होते. अर्पिताने गेल्या काही महिन्यांत बरेच वेट गेन केल्याचे यावेळी जाणवत होते.
बघा गणेश चतुर्थीच्या दिवशी क्लिक करण्यात आलेली अर्पिताची ही छायाचित्रे...