आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सलमान करतोय 'एक था टायगर'च्या यशाचे सेलिब्रेशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'एक था टायगर' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग मिळाले आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या बिझनेसने बॉलिवूडमध्ये नवा इतिहास रचला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विक्रमी ३३ कोटींची कमाई केली. आता पुढच्या आठवड्याभरात हा सिनेमा २०० कोटींची कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चित्रपटाला मिळालेले हे यश पाहून साहजिकच सलमान खान आनंदात असणार हे काही वेगळे सांगायला नको. सलमानने हा आनंद एका पार्टीचे आयोजन करुन साजरा केला.
१६ ऑगस्टच्या रात्री सलमानने मित्रमंडळी आणि आपल्या कुटुंबासाठी मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये स्पेशल स्क्रिनिंग ठेवले आणि त्यानंतर जल्लोषात पार्टी साजरी केली.
या पार्टीत सलमान आणि कतरिनाबरोबर सुभाष घई, राज कुमार संतोषी, फराह खान, रोहन सिप्पी, प्रिटी झिंटा, सलमानच्या बहिणी अर्पिता आणि अलविरा, अतुल अग्निहोत्री सहभागी झाले होते.
पाहा या पार्टीची खास छायाचित्रे...