राबिया खान सध्या त्यांची मुलगी जियाच्या मारेक-यांचा शोध घेत आहेत. त्या एका गोष्टीवर अडून बसल्या आहे, की सूरज पांचोली तिच्या आत्महत्येचा आरोपी आहे. तसेच सूरजला बॉलिवूडचा सुपरस्टार
सलमान खान पक्ष देत असल्याचा आरोपसुध्दा त्यांनी सलमानवर लावला आहे. या सर्व आरोपांनंतरसुध्दा सलमान सुरजच्या बाजूने उभा आहे. सूरज 'हीरो' या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून हा सिनेमा सलमानच्या प्रॉडक्शनमध्ये बनत आहे. सोबतच, सूरजचे प्रकरण लढणारे वकिल श्रीकांत शिवादे हे सलमानचेसुध्दा वकिल आहेत.
सोमवारी राबिया खान यांनी कोर्टात सूरजच्या विरोधात पुरावे सादर केले तेव्हा शिवादे जोधपूरच्या कोर्टात सलमानच्या 'ब्लॅक बक' प्रकरणात व्यस्त होते. नंतर शिवादे यांनी मंगळवारी सूरजच्या प्रकरणासाठी हजेरी लावली होती.
एका सुत्राने सांगितले, 'सूरजच्या पदार्पणाच्या सिनेमाविषयी सलमान निश्वित आहे. सलमानची सूरजसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्याने सूरजला 'हीरो' सिनेमाच्या स्टंट्ससाठी त्याच्या पनवेल परिसरातील शेतात सराव करण्याची परवानगी दिली आहे. सलमानने सूरजच्या विरोधात 24 मार्चला होणा-या सुनवणीला स्थगित करण्यासाठी आपल्या वकिलांकडून बराच प्रयत्न केला होता. त्याने जियाची आई राबिया खान यांच्या विरोधात मानहानीचा दावा करण्याचाही निर्णय घेतला होता.'
सूरजचे वडील आदित्य पांचोलीने सांगितले, 'हो आमचे वकिल श्रीकांत शिवादे आहे. आम्हाला सूरजच्या भविष्याविषयी कोणतीच चिंता नाहीये.'
जियाच्या आईने सूरजवर आरोप लावले होते त्यानंतर आदित्य पांचोलीने पत्नी वहाब आणि मुलगा सूरजला मनालीला जाण्यास सांगितले होते. परंतु सूरजने यासाठी नकार दिला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा आदित्यनेसुध्दा केली जियाच्या आत्महत्या प्रकरणात विशेष तपासणीची मागणी..?