आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Made My Birthday Special: Sajid Nadiadwala

'किक'च्या सेटवर सलमानने साजरा केला साजिदचा बर्थ डे, भावूक झाले वातावरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला सध्या सलमान खानसोबत आगामी 'किक' सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. आत्तापर्यंत साजिद यांना निर्माता म्हणून ओळखले जात होते. मात्र आता ते दिग्दर्शकाच्या भूमिकेतून समोर येत आहेत. किक हा सिनेमा साजिद दिग्दर्शित करत आहेत. मंगळवारी (18 फेब्रुवारी) रात्री सलमानने साजिद खानला एक आश्चर्याचा धक्का दिला. मंगळवारी साजिदचा वाढदिवस होता. यानिमित्ताने सलमानने त्यांना सरप्राईज बर्थ डे पार्टी दिली.
फिल्मसिटीमध्ये सिनेमाचे शुटिंग सुरु आहे. वाढदिवशी साजिद फिल्मसिटीतच थांबले होते. कामात बिझी असल्यामुळे त्यांनी आपल्या वाढदिवसाचे काहीही प्लानिंग केले नव्हते. मात्र साजिदचा वाढदिवस सलमानच्या लक्षात होता. त्याने कॅमे-याच्या आकारातील एक खास केक साजिदसाठी मागवला. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
साजिदने मीडियाशी बोलताना सांगितले, की ''मी वयाची 50 वर्षे पूर्ण करायला आता केवळ एकच वर्ष शिल्लक राहिलं आहे. सलमानने दिलेल्या या सरप्राइज बर्थ डे पार्टीमुळे मी खूपच भावूक झालोय. हा वाढदिवस माझ्यासाठी खूपच स्पेशल आ हे. सलमानसारखे मित्र जवळ असतील तर सर्वच गोष्टी स्पेशल होऊन जातात.''
साजिदच्या क्रू मेंबरने मीडियाला सांगितले, की हा क्षण साजिदसाठी खूपच भावूक होता. सलमान, जॅकलीन आणि कोरिओग्राफर अहमद खान यांच्यासह संपूर्ण क्रू मेंबर्सनी साजिदसाठी बर्थ डे साँग म्हटले. सर्वांनीच ही पार्टी एन्जॉय केली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा 'किक'च्या सेटवरील ही खास छायाचित्रे...