आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Set For A Bollywood First As Ek Tha Tiger Is Dubbed Into Japanese

‘टायगर’आता जपानी प्रेक्षकांच्या भेटीला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -‘एक था टायगर’ हा सिनेमा येत्या 7 मार्च रोजी जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमान खान चक्क जपानी भाषेत बोलताना दिसणार आहे.या पार्श्वभूमीवर सिनेमाचा दिग्दर्शक कबीर खान याने टोकियो शहरात प्रचार मोहीम सुरू केली आहे. कबीर खानने ट्विटरवर ही माहिती दिली.

सलमान खानला रुपेरी पडद्यावर जपानी बोलताना पाहण्यास आपण उत्सुक असल्याचे कबीरने म्हटले आहे. गेल्या 15 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी विक्रमी 33 कोटी रुपयांची कमाई केली होती. 'न्युयॉर्क' आणि 'काबुल एक्सप्रेस'नंतर कबीर खानचा हा तिसरा सिनेमा आहे.

'एक था टायगर' हा सिनेमा भारतात रिलीज होऊन बराच काळ लोटला आहे. सलमान खान आणि कतरिना कैफची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाने दोनशे कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे.

तसे पाहता जपानमध्ये भारतीय सिनेमांसाठी खास मार्केट नाहीये. एकेकाळी येथे राज कपूर यांचे सिनेमे चालत होते. त्यानंतर रजनीकांत येथे खूप प्रसिद्ध झाले. आता सलमान खानलासुद्धा तीच प्रसिद्धी प्राप्त होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.