आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GUILD AWARDSच्या स्टेजवर शाहरुख-सलमानने पुन्हा एकदा घेतली गळाभेट, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी रात्री मुंबईत स्टार गिल्ड अवॉर्ड्स 2014 सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी दोन खान अर्थातच शाहरुख खान आणि सलमान खान आपल्यातील वैर विसरून एकमेकांची गळाभेट घेताना दिसले.
होय, तुम्ही अगदी बरोबरच वाचलं आहे. शाहरुख आणि सलमानने एकमेकांची विचारपूस करत गळाभेट घेताच कार्यक्रमाला उपस्थित लोकांच्या नजरा त्यांच्यावर खिळून राहिल्या. सलमानने शोचे सुत्रसंचालन करताना शाहरुखशी बोलणे सुरु केले आणि जेव्हा शाहरुख स्टेजवर आला तेव्हा सलमानने त्याची गळाभेट घेतली.
यापूर्वी गेल्यावर्षी म्हणजे 21 जुलै 2013 रोजी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत हे दोघे अशीच गळाभेट घेताना दिसले होते. यावेळी या दोघांनी एकमेकांना इफ्तारच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आता नवीन वर्षांच्या सुरुवातील शाहरुख आणि सलमानने पुन्हा गळाभेट घेऊन त्यांच्यातील कटुता हळूहळू दूर होत असल्याचे शुभसंकेत दिले, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला स्टार गिल्ड अवॉर्डदरम्यान सलमानने कसे शाहरुखशी बोलणे सुरु केले आणि 2008मध्ये कतरिनाच्या वाढदिवशी असे काय घडले होते, की दोघांत वैर निर्माण झाले, ते सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या शाहरुख-सलमानच्या मैत्री आणि शत्रुत्वाबद्दल बरंच काही...