आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्यांदाच बाप्पाला घरापासून दूर घेऊन चाललाय सलमान, जाणून घ्या का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पा विराजमान होतात. सलमानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट हा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र सलमानचे बाप्पा वांद्र्यातील घराऐवजी पनवेलला जाणार आहेत. एवढ्या वर्षांतच पहिल्यांदाच सलमानच्या वांद्र्यातील घरी बाप्पाचे आगमन होणार नाहीये.

झालं असं, की सलमानच्या वांद्रा येथील निवासस्थानाचे नूतनीकरन सुरु असल्यामुळे सलमान आपल्या कुटुंबासह पनवेल येथे राहायला जाणार आहेत. त्यामुळे आता सलमानचे बाप्पाही त्याच्यासह पनवेलला जाणार आहेत.

सलमानची छोटी बहिण अर्पितानं घरी गणेशाच्या प्रतिष्ठापनेची सुरुवात केली होती. मागील 11 वर्षांपासून सलमानचे संपूर्ण कुटुंब गणेशाची मनोभावे पूजा करीत आहे. सलमानच्या घरी येणारा बाप्पा हा इको फ्रेंडली असतो.

सलमानच्या बहिणी अर्पिता आणि अल्वीरा पनवेलच्या घरी गणपती पूजेची तयारी करणार आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा सलमानच्या घरी गेल्या वर्षी क्लिक झालेली गणपती पूजेची खास छायाचित्रे...