आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानची कबुली 'क्लीवेज दिसणारा ड्रेस घातल्यामुळे चिडलो होतो' !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान आपल्या मित्रांविषयी खूपच पजेसिव असल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. विशेषतः एक्स गर्लफ्रेंड असलेल्या कतरिनाविषयी सलमान जरा जास्तच पजेसिव आहे. काही दिवसांपूर्वी सलमान आणि कतरिनाच्या भांडणाची बातमी आली होती.
कतरिनाने खूपच छोटा ड्रेस परिधान केल्यामुळे सलमानने कतरिनाला चांगलेच रागावले असल्याची ती बातमी होती. सलमानच्या रोषाला सामोरे गेल्यामुळे कतरिनाला रडू आवरता आले नव्हते. तिने स्वतःला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बंद करुन ठेवल्याचेही बोलले जात होते. नंतर ही बातमी अफवा असल्याचे सांगण्यात आले होते.
अलीकडेच यासंदर्भात सलमान पहिल्यांदाच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलला. सलमानने सांगितले की, ''तू (कतरिनाबद्दल सलमान बोलत आहे) माझ्या चित्रपटात काम करत आहे. तू चित्रपटातील लिडींग लेडी आहेस. अशात तुला काय चांगले दिसते आणि काय नाही हे मी तुला सांगू शकतो. अशा कपड्यांमुळे तुझ्या इमेजला धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे लगेच तू कपडे बदल.'' असे मी कतरिनाला म्हटले आणि तिला कपडे बदलून सेटवर यायला सांगितले. यावर मी काही चुक केले असे मला वाटत नसल्याचे सलमानने सांगितले.
अखेर सलमान कतरिनावर चिढला ही बातमी अफवा नसून प्रत्यक्षात घडली हे सलमानच्या या वक्तव्यावरुन स्पष्ट झाले आहे. आजही सलमानच्या मनात कतरिनाबद्दल प्रेमाची भावना कायम असल्याचेही सिद्ध झाले.

CAUGHT: अरे अंधारात सलमान-कॅटचे हे काय सुरु आहे ?
'एक था टायगर'सोबत शाहरुखचाही चित्रपट विकत घ्यावा लागेल; सलमान नाराज
फराहचा खुलासा, 'बोमन नाही तर सलमान होता माझी फर्स्ट चॉईस'
कतरिनाला तोकड्या कपड्यात बघून चिडला सलमान, पहिल्यांदा शिवीगाळ, नंतर केली मारहाण !