आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दबंग' इमेज बदलण्यास सलमान उत्सुक, आता होणार 'राधे'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोहेल खानच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या 'राधे' सिनेमासाठी अभिनेता सलमान खान खूपच उत्साहित आहे. या सिनेमाद्वारे तो आपली दबंग प्रतिमा बदलू इच्छित आहे. 'राधे' दक्षिणचा सुपरहिट 'स्टालिन' चा रिमेक आहे. विशिष्ट वर्गाच्या लोकांना सिनेमा पसंत यावा म्हणून सलमान आपली प्रतिमा बदलू इच्छित आहे. सिनेमात सलमान एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत आहे, तो समाजाला बदलण्याचे काम करत असतो.
सिनेमाच्या इतर भूमिकेसाठी अभिनेत्री तब्बू आणि नसिरुद्दीन यांच्याकडे सोहेलने प्रस्ताव पाठवला आहे. सलमाननेच या दोघांचे नाव सोहेलला सुचवले आहे. तब्बू आणि नसिरुद्दीन सारखे कलाकार त्याच्या सिनेमाला वेगळे रूप देऊ शकतील, असे सलमानचे म्हणणे आहे. तब्बू सलमानच्या बहिणीच्या भूमिकेत असेल, तर नसिरुद्दीनची भूमिका अजून ठरलेली नाही. नसिरुद्दीन यांनी होकार दिल्यास त्यांच्याबरोबरचा सलमानचा हा पहिलाच सिनेमा असेल. आहे. तब्बूसोबत सलमानने याआधीही 'हम साथ साथ हैं', 'बीवी नंबर वन' आणि 'जीत' या सिनेमांमध्ये काम केले आहे.
एकंदरीतच 'दबंग'नंतर सलमानचे 'राधे' हे रुप बघण्यास त्याचे चाहतेही उत्सुक असणार हे काही वेगळे सांगायला नको.