आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानची खास मैत्रीण \'लूलिया\'ची बॉलिवूड एंट्री, \'ओ तेरी\'मध्ये लावणार ठुमके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानच्या 'जय हो'ला धमाकेदार ओपनिंग मिळाले नाही. परंतु सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. सिनेमा फ्लॉप होण्याच्या मार्गावर होता परंतु एकुण कमाईने सिनेमाला अपयशी होण्यापासून वाचवले. अंदाज व्यक्त केला जात आहे, की सिनेमा आता 125 कोटींपर्यंत कमाई करू शकतो. परंतु आता एक रंजक बातमी माध्यमांना मिळाली आहे, ती म्हणजे सलमान त्याची खास मैत्रीण लूलिया वंटूरला बॉलिवूडमध्ये आणतोय.
'जय हो' सिनेमाच्या शुटिंगच्या सेटवर लूलिया नेहमी येत होती. तसेच, सलमानसुध्दा सिनेमाच्या शॉटसाठी रोमानियाला गेला होता. आता सलमानने बॉलिवूडमध्ये लूलियासाठी बॉलिवूडची दारं उघडली आहेत. सलमानने 'ओ तेरी'चा निर्माता आणि त्याचा भावोजी अतुल अग्निहोत्रीला दोन गाण्यात लूलियाला सिनेमात घेण्यास सांगितले आहे. यामध्ये ती पंजाबी गायक मीकासिंहसोबत स्क्रिन शेअर करेल.
एका सुत्राने सांगितले, 'सिनेमासाठी दोन गाणी शुट करण्यात आली आहेत. यापैकी एका गाण्यात लूलिया सलमानसह झळकणार आहे. याशिवाय ती अभिनेते पुलकित सम्राट आणि बिलाल अमरोहीसोबतही थिरकताना दिसेल. ही गाणी सिटी स्टूडिओमध्ये शुट करण्यात येतील. या गाण्यातील लूलियाचा ड्रेस एश्ले रिलेबो आणि अल्वीरा अग्निहोत्री डिझाइन करणार आहेत.'
लूलिया कोणत्या गाण्यावर दाखवणार जलवा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...