कन्नोज -
सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटाची नायिका डेजी शाहवर उत्तरप्रदेशातील कन्नोजमध्ये गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. कन्नोजच्या सत्येंद्रसिंह यांनी डेजीवर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी डेजीसोबत एक दोन नाही तर दिड डझनाहून अधिक लोकांविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
कोण आहे सत्येंद्रसिंह
सत्येंद्रसिंह अभिनेता असून राजकारणातही सक्रिय आहे. त्याने काही चित्रपटांची देखील निर्मीती केली आहे.
काय आहे प्रकरण
सत्येंद्रसिंह डिसेंबर 2013 मध्ये एका कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. तेव्हा या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासांती हा एक अपघात असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता त्याने पोलिसात एक तक्रार दाखल केली आहे. त्यात अभिनेत्री डेजी शाह आणि कोरियोग्राफर गणेश आचार्यसह 21 जणांचे नाव आहे. सत्येंद्रचा आरोप आहे, की डिसेंबरमध्ये त्याचा झालेला अपघात हा निव्वळ अपघात नसून त्याला जीवे मारण्याचा कट होता, आणि त्यात डेजी शाहचा सहभाग होता.
पुढील स्लाइडवर, सत्येंद्रचा अर्ज..