आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचा अफगाणी खलनायक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच एका अफगाणी अभिनेत्याने एंट्री केली आहे. ऋतिक रोशनच्या ‘क्रिश 3’ मध्ये अफगाणिस्तानचा समीर अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. समीरला बॉलिवूडमध्ये येण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे तो 2007 लाच अफगाणिस्तानातून भारतात आला. पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी घेऊन तो सिनेमांकडे वळला. एवढय़ा मोठ्या सिनेमातून मला बॉलिवूडमध्ये येण्याची संधी मिळाली यासाठी मी अल्लाहाचा आभारी असल्याचे समीर म्हणतो. याबरोबरच त्याने ऋतिकलाही धन्यवाद दिला आहे. तो म्हणतो, एका मित्रासारखी ऋतिकने माझी मदत केली.