आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : घोड्यावर नव्हे, बाइकवर स्वार होऊन आला समीराचा नवरदेव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी आणि बाइकविश्वात 'वर्देंची मोटारसायकल' हा ब्रँड नावारूपाला आणणारा मराठमोळा तरुण उद्योजक अक्षय वर्दे 21 जानेवारी रोजी लग्नगाठीत अडकले. लग्न म्हटलं की नवरदेव घोड्यावरुन येणार हे सर्वसाधारण चित्र असतं. मात्र समीराचा नवरदेव अर्थातच अक्षय याला अपवाद ठरला. कारण अक्षय घोड्यावर नव्हे तर बाइकवर स्वार होऊन विवाहस्थळी पोहोचला.
अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुंबईतील वांद्रे येथे हा विवाहसोहळा पार पडला. अडीच वर्षांपूर्वी अक्षय आणि समीरा रेड्डी संपर्कात आले होते. या ओळखीचे रुपांतर पहिले मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांचा साखरपुडाही झाला. अक्षय आणि समीराने खरं तर एप्रिलमध्ये लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, अचानक त्यांचा प्लान बदलला आणि ते 21 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर हे दोघे विवाहबंधनात अडकले.
अक्षय वर्दे हे नाव मोटारसायकल विश्वातील प्रसिद्ध नाव आहे. हिंदी चित्रपटांमध्ये आव्हानात्मक स्टंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खास बाइक अक्षय वर्दे यांच्या कंपनीकडूनच दिल्या जातात.
समीरा आणि अक्षयसाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी ड्रेस डिझाईन केले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा अक्षय-समीराच्या लग्नाची ही खास छायाचित्रे..