आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
शुक्रवारी रिलीज झालेल्या 'फटा पोस्टर निकला हीरो' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या सिनेमाच्या प्रीमिअरला बी टाऊनमधील अनेक मंडळी पोहोचली होती. सलमान खानच्या कुटुंबाची येथे विशेष हजेरी होती.
सलमानचे वडील सलीम खान, आई सलमा खान, सलीम खान यांची दुसरी पत्नी हेलन, सलमानची बहीण अलविरा आणि तिचा पती अतुल अग्निहोत्री येथे दिसली. यांच्याबरोबर सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीने. सलमानच्या कुटुंबाबरोबर संगीता या स्क्रिनिंगला पोहोचली होती.
संगीता सलमानची एक्स गर्लफ्रेंड असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. सलमानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर संगीताने क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनबरोबर लग्न केले. मात्र लग्नानंतरसुद्धा सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांबरोबरचे संगीताचे बाँडिंग कधीच तुटले नाही.
सार्वजनिक ठिकाणी सलमानच्या कुटुंबीयांबरोबर संगीता हमखास दिसत असते. विशेषतः सलमानची आई सलमा खान यांच्याबरोबर संगीताचे स्पेशल बाँडिंग आहे.
असो, शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या 'फटा पोस्टर निकला हीरो'च्या स्क्रिनिंगला सलमानच्या कुटुंबीयांबरोबरच आशा पारेख, प्रेम चोप्रा, शशिकला हे स्टार्सही पोहोचले होते. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या सिनेमात शाहिदबरोबर इलियाना डिक्रूज मेन लीडमध्ये आहे.
बघा या स्पेशल स्क्रिनिंगची ही खास छायाचित्रे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.