आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangram Singh And Payal Rohatgi Engagement Pictures

पाहा, पायल रोहतगी आणि संग्रामसिंहच्या साखरपुड्याचे खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने तिचा बॉयफ्रेंड संग्रामसिंह सोबत 27 फेब्रुवारीला शिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर संग्रामसह साखरपुडा केला. साखरपुड्याचा हा कार्यक्रम पायलच्या अहमदाबाद स्थित राहत्या घरी जवळच्या नातेवाईकांच्या हजेरीत पार पडला.
पायलने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना ट्विटरवरुन दिली होती. 29 वर्षीय पायलने ट्विट केले होते, ''आज शिवरात्रीचा सण आहे. आजच्या दिवशी मी संग्रामसिंह सोबत साखरपुडा केला. भगवान शिवचे धन्यवाद. तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठिशी असो.''
पायल आणि संग्राम गेल्या दोन वर्षांपासून एकत्र आहेत. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
पायल आणि संग्रामची पहिली भेट 'सर्व्हायवर इंडिया' या रिअॅलिटी शोच्या सेटवर झाली होती. 2012 पासून हे दोघे सोबत आहेत. 'व्हॅलेंटाइन नाइट' या सिनेमात हे दोघे एकत्र झळकले होते. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत.
पायल रोहतगी 'बिग बॉस'च्या दुस-या पर्वात सहभागी झाली होती. या शोमध्ये राहुल महाजनसोबत तिची जवळीक वाढली होती. तर संग्रामसिंहला रेसलर म्हणून ओळखले जाते. 2012मध्ये दक्षिण आफ्रिकेने त्याला 'वर्ल्ड बेस्ट रेसलिंग अवॉर्ड'ने सन्मानित केले होते. संग्राम अलीकडेच 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात झळकला होता. शोमध्ये फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती. शिवाय तो सध्या 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेत झळकत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा संग्राम आणि पायलच्या साखरपुड्याची ही खास छायाचित्रे...