मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे. संजयची पत्नी मान्यता दत्त आजारी आहे, अलीकडेच तिच्यावर शस्त्रक्रिया करुन तिच्या लिव्हरमधून सहा सेंटीमीटरचा ट्युमर काढण्यात आला आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. आजारपणात पत्नीला जास्तीत जास्त वेळ देता यावा अशी संजयची इच्छा आहे. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा तीस दिवसांची सुटी मिळावी यासाठी पॅरोलचा अर्ज केला आहे. संजय 21 डिसेंबर 2003 पासून पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे. त्याला या महिन्याच्या 21 तारखेला तुरुंगात परतावे लागणार आहे. मात्र संजयचा पॅरोलचा अर्ज पुन्हा मंजूर झाल्यास त्याला आणखी महिनाभर तुरुंगाबाहेर राहता येईल.
कोणता आजार आहे मान्यताला?
संजयची पत्नी मान्यताच्या लिव्हरमध्ये सहा सेटींमीटरचा ट्युमर आहे. 8 जानेवारी रोजी मुंबईतील ग्लोब रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करुन हा ट्युमर काढण्यात आला. मान्यताला हृदयरोगाचाही आजार आहे. त्यामुळे तिला अँजियोग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
काय असतो लिव्हर ट्युमर ?
लिव्हरमध्ये ट्युमर असल्यास कॅन्सर होण्याची शक्यता असते. लिव्हर कॅन्सर दोन स्टेजमध्ये असतो. प्रायमरी आणि सेकेंडरी. प्रायमरी स्टेजमध्ये लिव्हर कॅन्सर ट्युमरमध्ये वाढू लागतो. तर सेकेंडरी स्टेजमध्ये लिव्हर कॅन्सर शरीरातील इतर भागातही पसरत जातो. लिव्हर ट्युमरवर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही, तर त्याचे रुपांतर कॅन्सरमध्ये होते.
... त्यामुळे संजय दत्तने केला पॅरोलचा अर्ज
मान्यताच्या लिव्हरमध्ये ट्युमरचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी स्पष्ट केले होते, की शस्त्रक्रियेनंतर मान्यताला संजयची जास्त गरज भासणार आहे. आता 21 फेब्रुवारी रोजी संजयची पॅरोलची मुदत संपणार आहे. त्यामुळे मान्यताची प्रकृती आणि डॉक्टरांनी दिलेला सल्ला बघता संजयला पॅरोलमध्ये वाढ मिळण्याची शक्यता आहे. संजय मागील काही दिवसांपासून मान्यतासोबत असून तिची देखभाल करतोय.
पुढील स्लाईड्सवर वाचा, संजयने पुन्हा केला पॅरोलचा अर्ज आणि सोबतच जाणून घ्या एखाद्या कैद्याला किती वेळा पॅरोल मंजूर होतो...