आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt’S Close Friends Sympathize In Bad Times

संजयला बॉलिवूडकरांची साथ, मनोधैर्य वाढवण्यासाठी पोहोचले घरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाने 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना आज (गुरुवार) शिक्षा सुनावली. यामध्ये अभिनेता संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालानंतर संजयच्या कुटुंबीयांवर संकटांचा डोंगर कोसळला आहे. निकालानंतर संजयला आपले अश्रू आवरता आले नाही. त्याने आपल्या कुटुंबीयांना आलिंगन घातले.
संजयच्या या कठीण परिस्थितीत त्याचे जवळचे मित्र त्याच्यासोबत आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोर्टाचा निकाल येताच संजयच्या बॉलिवूडमधील मित्रांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. संजयच्या घरी पोहोचलेल्या सेलिब्रिटींमध्ये सुजॉय घोष, बाबा सिद्दीकी, बंटी वालिया, रुमी जाफरी, मिलन लुथरा आणि निर्माता राहुल अग्रवाल यांचा समावेश आहे.
संजयच्या घराबाहेर त्याच्या चाहत्यांनीही गर्दी केली आहे. चाहत्यांची गर्दी बघता बंगल्याबाहरे कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.