आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt 100 Crore Accepted To Sanjay Duttas Hindi Movie Policegiri

संजूच्या ‘पोलिसगिरी’ला शंभर कोटींची अपेक्षा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सध्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तला त्याच्या आगामी ‘पोलिसगिरी’ या चित्रपटाकडून शंभर कोटींच्या कमाईची अपेक्षा असल्याचे दिग्दर्शक के. एस. रवीकुमार यांनी सांगितले.

रवीकुमार म्हणाले, काही दिवसांपूर्वीच संजयसोबत बोलणे झाले होते. हा चित्रपट 100 कोटींची कमाई करेल असा विश्वास त्याने व्यक्त केला होता. चित्रीकरणादरम्यान संजय खुप अस्वस्थ होता. तरीदेखील त्याने मोठय़ा धीराने चित्रीकरण पूर्ण केले. ‘पोलिसगिरी’साठी त्याने इतर चित्रपटांपेक्षा अधिक वेळ दिला होता. हा चित्रपट पाच जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून यात अभिनेत्री प्राची देसाई आणि प्रकाश राज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

संजय चांगला माणूस : प्राची
पोलिसगिरी चित्रपटात प्राची देसाई नायिका आहे. ‘संजू दज्रेदार अभिनेत्याबरोबर चांगला माणूसही आहे. शिक्षा भोगल्यानंतर तो पुन्हा त्याच जोमाने काम करेल,’ असा विश्वास तिने व्यक्त केला.