आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt And Ganesh Acharya Cries On Shooting Set Of Policegiri

...आणि 'पोलिसगिरी'च्या सेटवर ढसाढसा रडला संजूबाबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर संजय दत्तची पोलिसांना शरण येण्याची मुदत संपत आली आहे. संजय दत्तला आता लवकरच तुरुंगवारी करावी लागणार आहे. त्यामुळे संजय दत्तची बैचेनी वाढत आहे. एकीकडे शूटिंग संपवण्याची घाई आणि दुसरीकडे तुरुंगामध्ये जायचे असल्याची जाणीव यामुळे सतत दबावाखाली असलेल्या संजयचा मूड बदलला आहे. सिनेमाच्या सेटवर नेहमी मजामस्ती करताना दिसणारा संजय दत्त गुरुवारी मात्र सेटवर चक्क रडला.

झाले असे की, संजय दत्त सध्या 'पोलिसगिरी' या सिनेमाचे शुटिंग संपवण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी 'पोलिसगिरी' या सिनेमातील एक आरतीचे गाण्याचे शुटिंग सुरु होते. कोरियोग्राफर गणेश आचार्य संजय सोबत हे गाणे शूट करत होता, तेव्हा संजयला अचानक रडू कोसळले. संजयच्या या स्थितीकडे पाहून गणेशही भावुक झाला. संजय आणि कोरियोग्राफर रडत असल्याचे पाहून सेटवर असलेले दोनशे ज्युनिअर आर्टीस्टदेखील रडू लागले. सेटवरचे वातावरण आपल्यामुळेच बदलल्याची जाणीव होताच संजयने स्वतःला सावरले. मात्र व्हॅनिटीच्या दिशेने जाताना पुन्हा एकदा त्याने गणेशला अलिंगन दिले. यावेळी दोघांनाही एकदम रडू कोसळले. त्यामुळे सेटवर सगळे काम ठप्प झाले आणि वातावरण एकदम शोकाकूल होऊन गेले.