आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजयला वाढदिवसानिमित्त मिळाल्या थोरल्या मुलीकडून शुभेच्छा, बघा UNSEEN PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा वाढदिवस आहे. 29 जुलै 1959 रोजी सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या घरी संजू बाबाचा जन्म झाला होता. आपल्या अभिनयाच्या जोरावर संजयने जगभरात नाव कमावले. सोबतच वादांमुळेही तो चर्चेत राहिला.

संजयच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतार आले. पहिली पत्नी रिचा शर्माच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी त्रिशाला आपल्या आजीआजोबांकडे वाढली. आता संजयची ही थोरली कन्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास इच्छूक आहे. मात्र त्रिशालाच्या या निर्णयामुळे वडील संजय दत्त नाखुश आहेत. त्रिशालाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करु नये, असे संजय दत्तचे म्हणणे आहे. मात्र त्रिशाला या ग्लॅमर जगात पहिले पाऊल टाकण्यास खूपच आतुर आहे. अलीकडेच त्रिशालाने तिचे काही ग्लॅमरस फोटोग्राफ्स ट्विटरवर अपलोड केले आहेत.

त्रिशालाने डिझायनिंगमध्ये आपले करिअर करावे अशी संजयची इच्छा आहे. आता त्रिशाला वडिलांचे म्हणणे ऐकणार की नाही हे येणा-या दिवसांत स्पष्ट होईल.

आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्रिशालाने ट्विटरवरुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्रिशालाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केले की....

'Happy Birthday to my king, my hero, my daddy @duttsanjay I love you SO much and miss you more than anything... I can't live without you'

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा त्रिशाला दत्तची काही खास छायाचित्रे...