आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RARE PIX: छायाचित्रांमध्ये बघा संजय दत्त आणि सलमान खानचा याराना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये कधी कुणाचा मित्र नसतो, असे म्हटले जाते. सलमान खान आणि संजय दत्त मात्र याला अपवाद आहेत. संजय आणि सलमानचा याराना जगजाहीर आहे. हे दोघेही बॉलिवूडचे बडे स्टार्स असून गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा सलमान उपचारासाठी अमेरिकेला गेला होता. मात्र अमेरिकेहून परत येताच सलमानने विमानतळावरुन थेट संजयचे घर गाठले.
शिवाय संजयची मुलगी त्रिशालाची भेट घेऊन तिला धीर दिला होता.
संजयनेसुद्धा त्याच्य पश्चात मान्यता आणि दोन्ही मुलांची जबाबदारी सलमानवर सोपवली आहे.
संजय आणि सलमानने 'साजन', 'चल मेरे भाई' या सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. स्मॉल स्क्रिनवर हे दोघेही बिग बॉसच्या पाचव्या पर्वात एकत्र दिसले होते. सलमान आणि संजयने मिळून हे पर्व होस्ट केले होते. सलमान संजयला मोठा भाऊ मानतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा संजय-सलमानचा याराना...