आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt Giving Tips To Producer Rahul Agrawal From Jail

तुरुंगातून संजय आणि राहुलमध्ये चिठ्ठीचा सिलसिला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


संजय दत्त तुरुंगाची हवा खात असतानाही आपल्या ‘पुलिसगिरी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी निर्माता राहुल अग्रवालला चिठ्ठी लिहून टिप्स देत आहे.

संजय दत्तचा ‘पुलिसगिरी’ हा सिनेमा 5 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र, संजय तुरुंगात असल्याने या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सहभागी होऊ शकत नाही. परंतु तुरुंगातून निर्मात्याला चिठ्ठीद्वारे तो टिप्स देऊन अप्रत्यक्षरीत्या प्रमोशनमध्ये सामील झाला आहे. तसा राहुल व संजयमध्ये चिठ्ठया पाठवण्याचा सिलसिला संजय येरवाडा जेलमध्ये गेल्यापासून सुरू आहे. आता जवळपास ते रोज एकमेकांना चिठ्ठया लिहीत आहेत. राहुल चिठ्ठीतून चाहत्यांच्या भावना संजयपर्यंत पोहोचवत आहेत, तर संजूबाबू देशात विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रमोशन करण्याच्या टिप्स देत आहे.

हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट करण्यासाठी संजयने यापूर्वीच स्क्रिप्टमध्ये बदल केले होते. आता आपल्या अनुभवानुसार सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो राहुल आणि सिनेमातील स्टार कलाकारांना प्रेरित करत आहे. टिप्सबरोबरच सिनेमातील इतर लहान-सहान कलाकारांची विचारपूस करण्यासही संजय विसरत नाही.