आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt Home And Children\'s Exclusive Pictures

संजयच्या टेंशनपासून अनभिज्ञ आहेत त्याची मुले शाहरान आणि इकरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1993 साली झालेल्या मुंबई ब्लास्ट प्रकरणात बेकायदेशीररित्या हत्यार बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणात संजयने यापूर्वीच अठरा महिन्यांचा तुरुंगवास भोगला असल्यामुळे त्याला आता पुढची साडे तीन वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. स

ध्या संजयच्या हातात असलेल्या सिनेमांचे चित्रीकरण पूर्ण व्हायचे आहे. त्यामुळे त्याने शरण येण्यासाठी मुदत वाढ मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने संजयला तात्पुरता दिलासा देत चार आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे. आता संजयला 16 मे रोजी पोलिसांना शरण यावे लागणार आहे. तुरुंगात जाण्यापूर्वी संजय आपल्या सर्व सिनेमांचे चित्रीकरण पूर्ण करण्यावर भर देतोय.

सुप्रीम कोर्टाने संजयला बुधवारी चार आठवड्यांची मुदत वाढ दिल्यानंतर त्याचे मित्र त्याची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी आले होते. यावेळी संजयची मुले शाहरान आणि इरा यांचीही छायाचित्रे आमच्या फोटोग्राफरने आपल्या कॅमे-यात कैद केली.

छायाचित्रांमध्ये बघा बुधवारी संजयच्या घराबाहेर काय परिस्थिती होती...