आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजूबाबा होणार फिटनेस गुरू?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तची सध्या झोप उडाली आहे. शारीरिक श्रम होत नसल्यामुळे आपल्याला झोप येत नसल्याचे संजयचे म्हणणे आहे. म्हणून त्याने तुरुंग प्रशासनाला मेहनतीचे काम देण्याची विनंती केली आहे. मात्र, सुरक्षिततेच्या कारणामुळे त्याला इतर कैद्यांसोबत मिळून कारपेंटर किंवा तत्सम काम करण्याची परवानगी नाही.

संजयला रोज व्यायाम करण्याची सवय आहे. मात्र, तुरुंगात व्यायाम करता येत नसल्यामुळे त्याची गोची झाली आहे. यावर एक उपाय म्हणून तो आता तुरुंग प्रशासनाला इतर कैद्यांसाठी फिटनेस ट्रेनिंग देण्याची परवानगी मागणार आहे. संजय एका दिवसात चार किंवा पाच बॅच ठेवू इच्छित आहे. त्यामुळे तो इतका थकेल की त्याला चांगली झोप येऊ शकेल. पाहूया तर तुरुंग प्रशासन आपल्या पोलिसगिरी स्वभावात मुन्नाभाईची विनंती स्वीकारतील का?