आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt May Complete Films Before He Surrenders

EXCLUSIVE : निर्माते संकटात, 15 दिवसांत सिनेमांचे शुटिंग पूर्ण करणार संजय !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुढील चार आठवड्यांत संजय दत्तला पोलिसांकडे शरणागती पत्करावी लागणार आहे. या बातमीमुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.

संजय दत्तला शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे त्याच्या हाती असलेल्या सिनेमांचे काय होणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण संजयची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या बहुतेक सिनेमांच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे.

यासंदर्भात संजय दत्तच्या एका निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार, ''संजय दत्तची महत्त्वाची भूमिका असलेल्या सिनेमांचे 75 टक्क्यांपेक्षा जास्त शुटिंग पूर्ण झाले आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये संजय दत्त उर्वरित शुटिंग पूर्ण करणार आहे.''

संजय दत्तजवळ जवळपास सहा प्रोजेक्ट्स आहेत. येत्या सोमवारपासून संजय शुटिंगला सुरुवात करणार असल्याची शक्यता असून उरलेले पंधरा दिवस तो आपल्या कुटुंबीयांबरोबर घालवणार आहे.

संजयचे आगामी सिनेमे कोणते आणि तो येणा-या पंधरा दिवसांत कोणकोणत्या सिनेमांचे शुटिंग पूर्ण करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...