आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या कोणत्या चुकीमुळे उद्धवस्त झाले संजूबाबाचे आयुष्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1993 साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्तला शरणागती पत्कारण्यासाठी मुदतवाढ द्यावी की नाही, याबाबत आज सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. संजयला आणखी चार आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

संजयने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत शरणागती पत्कारण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी मागितला होता. मात्र कोर्टाने त्याला शरण येण्यासाठी आणखी चार आठवड्यांचा कालावधी दिला आहे.

या प्रकरणात संजय दत्तने यापूर्वीच अठरा महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे त्याला आता साडे तीन वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत.

अखेर संजयला शिक्षा का सुनावण्यात आली ? तो एखाद्या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता का ?
खरं तर खटल्याच्या सुनावणीदरम्यान संजय दत्तने आपला जबाब बदलला होता. सुरुवातीला संजयने दिलेल्या आपल्या कबुली जबाबामध्ये सांगितले होते की, मुंबईत झालेल्या दंगलीनंतर त्याच्या कुटुंबीयांना धमकी मिळत होती. त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्याने एक 56 रायफल जवळ ठेवली होती. शिवाय मुंबईत बॉम्ब स्फोट झाले तेव्हा तो परदेशात होता. तेथूनच त्याने त्याचा मित्र युसूफ नलवालाला ती रायफल नष्ट करण्यास सांगितल्याचे, संजयने आपल्या जबाबामध्ये कबुल केले होते.

त्यानंतर पोलिसांनी संजय दत्तला ताब्यात घेतले होते. त्याच्यावर टाडा न्यायालयात खटला सुरु झाला. संजयला अठरा महिने तुरुंगात काढावे लागले होते. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती.

मुंबई बॉम्बस्फोटाची सुनावणी करणा-या टाडा न्यायालयाने 2006 साली संजय दहशतवादी नसून त्याने बेकायदेशीर हत्यार आपल्या घरात सुरक्षिततेसाठी ठेवल्याचे म्हटले होते. टाडाने त्याच्यावरील आरोप फेटाळले आणि त्याला आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत सहा वर्षांची शिक्षा सुनावली. काही दिवसांनी संजयला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या संजयने त्याच्या आयुष्यात कोणत्या चुका केल्या...