आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजयला मिळतेय वारंवार पॅरोलची मुदतवाढ, अखेर कधी शिक्षा भोगणार संजय दत्त?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त गेल्या एक महिन्यापासून पॅरोलवर तुरूंगाबाहेर आहे. त्याच्या पॅरोलची मुदत 21 जानेवारीला संपणार होती. म्हणजे संजयला आता पुन्हा तुरूंगात जावे लागणार होते. परंतु तुरूंगात जाण्यापूर्वीच त्याला पॅरोलची मुदतवाढ मिळाली आहे. संजय दत्तची पत्नी मान्यताची तब्येत ठिक नसल्याने त्याला पॅरोलची मुदत पुन्हा-पुन्हा वाढवून मिळत आहे. फुफ्फुसाच्या आजारामुळे मान्यतावर मुंबई येथे उपचार सुरु आहेत.
21 जानेवारीला पुन्हा तुरूंगामध्ये जाण्यापूर्वीच संजयला आणखी 30 दिवसांचे पॅरोल देण्यात आले आहे. म्हणजे आता तो फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुरुंगाबाहेर राहू शकतो.
संजय दत्तला 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु नंतर त्याची शिक्षा कमी करण्यात आली. कारण 18 महिन्यांची शिक्षा त्याने पहिलेच पूर्ण केली होती. आता 42 महिन्यांची शिक्षा त्याला पूर्ण करायची आहे. परंतु गेल्या तीन महिन्यांमध्ये अनेकदा पॅरोलवर तो तुरूंगाबाहेर आला. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक आरोपी मुजीब पारकरलासुध्दा 1 महिन्याचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
परंतु प्रश्न आहे तो संजयला वारंवार पॅरोल का मिळत आहे? सोबतच पॅरोल काय असते आणि कायदेशीर याची काय प्रक्रिया असते. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्वर क्लिक करा...