आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt Prays For Wife Manyata\'s Health At Siddhivinayak Temple

मान्यतासाठी प्रार्थना करायला संजय दत्त पोहोचला सिध्दीविनायकाच्या चरणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी मान्यताच्या तब्येतीमुळे खूप तणावाखाली आहे. अलीकडेच त्याच्या पॅरोलची मुदवाढ करण्यात आली आहे. मान्यता लवकरात-लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करायला संजय दत्त बुधवारी (22 जानेवारी) मुंबईतील प्रसिध्द सिध्दीविनायक मंदिरात गेला होता.
संजयच्या जवळच्या सुत्रांच्या सांगण्यानुसार, पत्नीला गंभीर परिस्थितीत बघून संजय खूप खचला आहे. सिद्धीविनायक मंदिराव्यतिरिक्त संजय पत्नीच्या स्वास्थासाठी प्रार्थना करायला सैय्यद हाजी अब्दुल रहमान शाह बाबाच्या दर्ग्यातही गेला होता.
मान्यता सध्या अनेक आजाराने त्रस्त आहे. तिला हृदयविकार असून, तिच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाले आहे. सोबतच तिला श्वास घेण्यासही त्रास होतोय. तिला परेलच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 8 जानेवारीला मान्यतावर एक शस्त्रक्रियासुध्दा झाली होती आणि आता आणखी एक शस्त्रक्रिया होणे बाकी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सिध्दीविनायक मंदिरातील संजय दत्तची काही छायांचित्रे...