आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज पहिल्यांदाच अभिनेता संजय दत्त मीडियासमोर आला. आजपासून संजय दत्त आपल्या सिनेमांच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. सुप्रीम कोर्टाने शरणागती पत्करण्यासाठी संजय दत्तला एक महिन्याचा कालावधी दिला आहे. या काळात संजय दत्त 'जंजीर' आणि 'पोलिसगिरी' या सिनेमांचे शुटिंग आणि डबिंग पूर्ण करणार आहे.
बहीण प्रिया दत्तबरोबर संजय मीडियाशी बोलायला आला होता. यावेळी मीडियाशी बोलताना संजय दत्तला अश्रू अनावर झाले होते.
संजय दत्त म्हणाला की, ''माझ्याकडे जेवढे दिवस शिल्लक आहेत, ते मला शांततेत घालवायचे आहेत. मीडियाला हात जोडून मी विनंती करतो की, मला हे दिवस शांततेत घालवू द्या. मी पूर्णपणे तुटलोय. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी हा संघर्षाचा काळ आहे. मी शिक्षा माफी मागत नाहीये. माझ्यासाठी जे लोक माफीची याचना करतायत त्यांचे मी आभार मानतो. माझे आपल्या देशावर खूप प्रेम आहे. मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो. लवकरच मी सरेंडर करणार आहे. सध्या माझ्या हातात खूप काम असून लवकरात लवकर मला ते पूर्ण करायचे आहे. आणि जास्तीत जास्त वेळ माझ्या कुटुंबीयांबरोबर घालवायचा आहे.''
पत्रकार परिषदेच्या वेळी संजय दत्त खूपच भावूक झाला होता. यावेळी बहीण प्रिया दत्तच्या गळ्यात पडून संजय दत्त रडत होता. मीडियाच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे न देता तो पत्रकार परिषदेतून निघून गेला.
आजपासून संजय मुंबईतील कमालिस्तान स्टुडिओमध्ये 'पोलिसगिरी'च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. त्यानंतर तो 'जंजीर'चे डबिंग करणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.