बॉलिवू़ड अभिनेता संजय दत्त अखेर पॅरोलवर तुरुंगाबाहेर पडला आहे. आता तो आपल्या कुटुंबीयांबरोबर आहे. शनिवारी संध्याकाळी संजय त्याच्या मुंबईच्या घरी पोहोचला. पत्नी मान्यताची तब्येत ठिक नसल्याचे कारण देऊन संजयने सुटी मागितली होती. मान्यताच्या यकृतात ट्युमर असल्याने तिच्यावर लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे आहे. मात्र संजयला जोवर घरी परतत नाही तोवर उपचार करुन घेण्यास मान्यताने नकार दिला होता. आता संजयच्या हजेरीत तिच्यावर उपचार होणार आहेत.
तसं पाहता, संजयला काही दिवसांपूर्वीच पॅरोल मंजुर झाला होता, मात्र त्याला सुटी मिळाल्याने बराच विरोध झाला होता. त्यामुळे तो तुरुंगाबाहेर पडू शकला नव्हता. मात्र आता प्रकरण शांत झाले असून तो एक महिन्यासाठी तुरुंगाबाहेर आला आहे.
यावेळी संजय बराच थकलेला दिसत होती. त्याचे वजनही पूर्वीपेक्षा बरेच कमी झालेले दिसले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा संजय दत्तची घरी जातानाची छायाचित्रे...