आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर शरणागती पत्करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने संजय दत्तला एक महिन्याचा अवधी दिला आहे. या काळात संजय दत्त त्याच्या हाती असलेल्या सिनेमांचे शुटिंग पूर्ण करण्याच्या बेतात आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर संजय दत्तने गुरुवारपासून आपल्या सिनेमांच्या शुटिंगला सुरुवात केली. तत्पूर्वी संजय गुरुवारी सकाळी पहिल्यांदाच मीडियासमोर आला. यावेळी त्याची बहीण प्रिया दत्तही त्याच्यासोबत हजर होती. मीडियाशी बोलताना संजय दत्तला आपल्या भावना अनावर झाल्या आणि तो प्रिया दत्तच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला. मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे न देता संजयने थेट मुंबईतील कमालिस्तान स्टुडिओत गाठले. येथे त्याच्या आगामी 'पोलिसगिरी' या सिनेमाचे शुटिंग सुरु आहे. तुरुंगात जाण्यापूर्वी संजयला जवळजवळ तीन सिनेमांचे शुटिंग पूर्ण करायचे आहे.
या सेटवरील संजयची छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या छायाचित्रांमध्येही संजयच्या चेह-यावरील टेंशन स्पष्ट दिसत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा संजयची खास छायाचित्रे...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.