आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजू बाबाला बघण्याची चाहत्यांची इच्छा राहिली अपुरी, कार्यक्रम झाला अचानक रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता कैदी संजय दत्तचा सहभाग असलेला कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला आहे. आज (गुरुवारी) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात येरवडा कारागृहाने 'महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन' हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र कारागृह प्रशासनाने हा कार्यक्रम अचानक रद्द केला. यामागचे कारण मात्र कारागृह प्रशासनाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

तुरुंग विभागाच्या कल्याणकारी योजनांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज (गुरुवारी) सायंकाळी 4 वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात संजय दत्त नाटिका आणि नृत्य सादर करणार होता.

संजय दत्त या कार्यक्रमाची तयारी करत असतानाचा व्हिडिओ अलीकडेच दुरदर्शन वाहिनीने प्रसारित केला होता. तुरुंगात गेल्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदाच संजय दत्तची झलक त्याच्या चाहत्यांना दिसली होती. संजय दत्तबरोबर 50 हून अधिक कैदी यात सहभाग घेणार होते.

हा कार्यक्रम दिग्दर्शित करण्याची जबाबदारी राजकुमार हिरानी यांना देण्यात आली होती. बुधवारीच राजकुमार हिरानी यांनी संजय दत्तची भेट घेतली होती. स्टेज परफॉर्मन्समध्ये संजय दत्त मुन्नाभाई एमबीबीएसचे काही संवाद सादर करुन एका गाण्यावर नृत्य करणार होता.

हा कार्यक्रम बघण्यासाठी संजयची पत्नी मान्यता दत्तही उपस्थित राहणार होती. याशिवाय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीही उपस्थिती या कार्यक्रमात राहणार होती.

मात्र अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत अद्याप कारागृह प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नसले तरी सुरक्षेच्या कारणांमुळे हे पाऊल उचलण्यात आले असावे, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आल्यामुळे चाहत्यांची संजय दत्तची एक झलक बघण्याची इच्छा अपुरी राहिली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा तुरुंगातील संजय दत्तची छायाचित्रे...