आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटीसाठी संजयने दिलेले कारण खोटे, ठणठणीत मान्यता पार्टी करण्यात बिझी, तुम्ही स्वतः बघा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तला पुन्हा एकदा एक महिन्याचा पॅरोल मंजूर झाला आहे. पत्नी मान्यताची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याला हा पॅरोल मंजूर झाली आहे. संजय दत्त शनिवारी कारागृहाबाहेर पडणार आहे.
दरम्‍यान, संजय दत्तला ज्‍या कारणासाठी पॅरोल मंजूर करण्‍यात आली आहे, त्‍या कारणावरुन अनेक प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित करण्‍यात आले आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. पत्नी मान्‍यताची प्रकृती ठीक नसल्‍याचे कारण देऊन संजयने पॅरोलसाठी अर्ज दिला होता. परंतु, आजारी असलेली मान्‍यता अगदी ठणठणीत बरी आहे. दोन दिवसांपूर्वीच ती 'आर... राजकुमार' या सिनेमाच्या प्रिमिअर पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी क्लिक करण्यात आलेली तिची छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.
मान्यताची ही छायाचित्रे बघून संजूबाबा चक्क खोटे बोलत असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या याविषयीचे सविस्तर वृत्त आणि बघा ठणठणीत मान्यताची छायाचित्रे...