आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Happy Wedding Anniversary: पाहा संजय-मान्यताच्या लग्नाचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संजय दत्तला त्याच्या आयुष्यात सध्या बरेच चढउतार बघावे लागत आहेत. तो सध्या पॅरोलवर येरवडा तुरुंगाबाहेर आहे. मात्र या महिन्याच्या 21 तारखेला त्याला पुन्हा एकदा तुरुंगात परतावे लागणार आहे. तर दुसरीकडे त्याची पत्नी मान्यता दत्त हिच्यावर अलीकडेच मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये सर्जरी झाली. तिच्या लिव्हरमधून सहा सेंटीमीटरचा ट्युमर काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या संजय तिच्यासोबत घरीच आहे. या अडचणींच्या काळात आजचा दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा आहे. कारण आज (11 फेब्रुवारी) त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस आहे. 11 जानेवारी 2008 रोजी संजय आणि मान्यताचे लग्न झाले होते.
कसे झाले लग्न ?
2008 मध्ये लग्न होण्यापूर्वी संजय आणि मान्यता दोन वर्षे डेटिंग करत होते. त्यानंतर त्यांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले. त्यांचे लग्न अगदी खासगीरित्या झाले होते. या लग्नात संजयचे जवळचे नातेवाईक आणि मित्र सहभागी झाले होते. सुनील शेट्टी आपल्या संपूर्ण कुटुंबासह लग्नात हजर होता. संजयचे मान्यतासोबतचे हे तिसरे लग्न होते. यापूर्वी त्याचे लग्न रिचा शर्मा आणि रिया पिल्लईसह झाले होते. संजयच्या पहिली पत्नी रिचाचे निधन झाले होते. तर दुसरी पत्नी रियासह त्याचा घटस्फोट झाला आहे.
कोण आहे मान्यता ?
मान्यताला बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री व्हायचे होते. मात्र काही बी ग्रेड सिनेमे आणि आयटम साँगपर्यंतच तिचे करिअर मर्यादीत राहिले. संजयसह भेट झाल्यानंतर तिेने आपल्या करिअरला ब्रेक लावला. मान्यताचे संजयसोबतचे हे दुसरे लग्न आहे. 2003 मध्ये तिचे लग्न मेराई उल रहमान नावाच्या व्यक्तिसोबत झाले होते. याशिवाय मान्यता आणि रहमान यांना एक मुलगा असून तो दुबईत मान्यताच्या नातेवाईकांकडे असतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा संजय-मान्यताच्या लग्नाची छायाचित्रे....