आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Want Help Of Salman Khan And Shahrukh Khan

संजयने मागितली शाहरुख-सलमानला मदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता संजय दत्त 18 एप्रिलला आत्मसर्मपण करणार आहे. यासाठी त्याच्याकडे अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे संजय आपले राहिलेले सिनेमे पूर्ण करत आहे. दुसरीकडे त्याला आपल्यासोबत काम करणार्‍या कर्मचार्‍यांची चिंता वाटत आहे. त्यामुळे संजयने शाहरुख खान आणि सलमान खानला आपल्या कर्मचार्‍यांना नोकरीसाठी मदत मागितली आहे.

आपल्या कुटुंबापेक्षा संजयला आपल्यासोबत काम करणार्‍या लोकांची जास्त चिंता वाटत आहे. त्यांना आपल्या कुटुंबाचा भाग मानणार्‍या संजयला त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि खाण्यापिण्याची चिंता आहे. तुरुंगात गेल्यावर त्यांना काही त्रास नको म्हणून संजय प्रयत्न करत आहे.